MPSC Current Affairs 21 September 2023 : क्रीडा, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, दिनविशेष, महत्वाचे दिवस, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या आणि केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना अशा अनेक 21 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली चालू घडामोडीवर आधारित महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.
MPSC Current Affairs 21 September 2023 : PDF Download करण्यासाठी
सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा
Table of Contents
National | राष्ट्रीय
- यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नवीन पेट्रोल आणि डिझेल कारवरील बंदी 5 वर्षांनी लांबवली आहे.
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना निमंत्रण दिले.
- सिंगापूर भारत सागरी द्विपक्षीय सराव (SIMBEX 23) ची 30 वी आवृत्ती सुरू झाली आहे, या मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय नौदल जहाजे, पाणबुडी आणि एलआरएमपी विमान सिंगापूरला पोहोचले आहे.
- भारत सरकारने कुशल टॅलेंट पूल विकसित करण्याच्या उद्देशाने ₹ 480 कोटींची योजना मंजूर करून देशाच्या वैद्यकीय उपकरण उद्योगाला बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
- या योजनेच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांचा स्थिर पुरवठा तयार करणे.
- आसाम सरकार मुखमंत्री आत्मानिर्भरशील असम अभियान नावाची नवीन योजना सुरू करणार आहे.
- या महत्त्वाकांक्षी योजनेचे उद्दिष्ट दोन लाख पात्र तरुणांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचे आहे.
- हा प्रशिक्षण उपक्रम व्यवस्थापन (management), लेखा (accounting) आणि उद्योजकता (entrepreneurship) यांच्याशी संबंधित कौशल्ये वाढवण्यावर भर देणार आहे.
- इंडो-डॅनिश एनर्जी भागीदारीचा एक भाग म्हणून चेन्नई येथे विंडर्जी इंडिया Windergy India 2023 शिखर परिषद सुरू होणार आहे.
- भारतीय निवडणूक आयोगाने ‘चाचा चौधरी और चुनवी दंगल’ हे पुस्तक प्रकाशित केले असून या द्वारे
- तरुणांना मतदार यादीत नावनोंदणी करून निवडनुकीत सहभागी होण्यासाठी तरुणांना प्रेरित केले जाणार आहे.
Economics Banking | अर्थव्यवस्था
- आशियाई विकास बँक ADB ने FY24 GDP अंदाज 6.3% पर्यंत कमी केला, असून भारत रेटिंग आणि संशोधन या संस्थेने विकास वाढीचा अंदाज 6.2% पर्यंत वाढवला आहे.
- मुंबई-आधारित बजेट एअरलाइन अकासा एअरला Akasa Air जागतिक मार्गांवर उड्डाण करण्यास सरकारची मंजुरी मिळाली आहे.
Sports | क्रीडा
- BCCI ने नुकतेच “गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स” हा कार्यक्रम सुरू केला असून या अंतर्गत भारतातील प्रसिद्ध आणि आदर्श व्यक्तींना क्रिकेट वर्ल्ड कप 2023 पाहण्यासाठी विशेष तिकीट दिले जाणार आहे.
- यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर , रजनीकांत अशा व्यक्तींचा समावेश आहे.
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 20 सप्टेंबर 2023 रोजी BCCI देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हंगाम 2023-26 साठी SBI Life ला अधिकृत भागीदार म्हणून घोषित केले आहे.
- भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने चीनमधील हांगझोऊ येथे आगामी आशियाई खेळ 2023 च्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाचे नेतृत्व करण्यासाठी एक नव्हे तर दोन ध्वजधारक हरमनप्रीत सिंग आणि लोव्हलिना बोर्गोहेन निवड करण्यात आली आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आगामी ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी अधिकृत थीम गाण्याचे अनावरण केले आहे.
- या गाण्याचे शीर्षक ‘दिल जश्न बोले’ असे आहे.
- 2024 मध्ये T20 क्रिकेट विश्वचषक सामने न्यूयॉर्क, डल्लास आणि फ्लोरिडा येथे आयोजित केले जाणार आहेत.
Technology | तंत्रज्ञान
- व्होल्वो ही कार बनवणारी कंपनी 2024 पर्यंत डिझेल कारचे उत्पादन संपवणार असून सर्व-इलेक्ट्रिक वाहने बनवणार आहे.
Awards & Appointments
- भारत सरकारने अलीकडेच विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या क्षेत्रात एक प्रतिष्ठितराष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे, ज्याला “राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार” (RVP) म्हणून ओळखले जाणार आहे.
दिनविशेष
- International Day Of Peace 2023
- World Alzheimer’s Day 2023
- International Week Of The Deaf 2023: September 18 To 24
Important Questions | महत्वाचे प्रश्न
- जागतिक शांतता दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?
- संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या वर्षी २१ सप्टेंबर हा दिवस अंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्याचा ठराव केला?
- केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा शेतकऱ्यापर्यत पोहचण्यासाठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?
- आशियाई क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न कधी होणार आहे?
- ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजी मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंने प्रथम स्थान पटकावले आहे?
- भारताच्या २०२४ वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रण दिले आहे?
- राज्यात गुणवत्तापूर्ण आणी दर्जेदार शिक्षणासाठी शाळा दत्तक योजना राबविण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या सरकारणे घेतला आहे?
- महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे समन्वक कोण असणार आहेत?
- महाराष्ट्र राज्यात कोठे इन्क्यूबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे?
- मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे?
- कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
- पर्यावरण क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्थशॉट २०२३ पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय स्टार्टअप कंपनीला नामांकन मिळाले आहे?
- महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदूषित (पीएम ची मात्रा १० पेक्षा अधिक) शहर कोणते आहे?
- Windergy India 2023 ही शिखर परिषद कोणत्या शहरात होणार आहे ?
उत्तरे:
प्रश्न क्र. | उत्तरे | प्रश्न क्र. | उत्तरे |
---|---|---|---|
1 | २१ सप्टेंबर | 8 | महिला व बालविकास आयुक्त |
2 | १९८१ | 9 | जालना |
3 | किसान ऋण पोर्टल | 10 | चाचा चौधरी और चुनावी दंगल |
4 | २३ सप्टेंबर | 11 | महाराष्ट्र |
5 | मोहम्मद सिराज | 12 | सायन्स फॉर सोसायटी |
6 | जो बायडेन | 13 | वसई विरार |
7 | महाराष्ट्र | 14 | चेन्नई |