Questions on Women Reservation Bill 2023: 27 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तो ऐतिहासिक क्षण आला आहे. लोकसभेने मंजूर केलेले महिला आरक्षण विधेयक गुरुवारी राज्यसभेतही मंजूर झाले. महिला आरक्षण विधेयक घटनादुरुस्ती १२८ अंतर्गत लोकसभेत मंजूर झाले आहे. महिलांना ३३% आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक लागू झाल्यापासून १५ वर्षे चालेल आणि हा कार्यकाळ विस्तारित करण्याचा अधिकार संसदेला असेल.
याच निमित्ताने स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खाली काही महत्वाचे प्रश्न दिले आहेत ते सविस्तरपणे वाचा आणि त्यांचा सराव करा.
Table of Contents
Questions on Women Reservation Bill 2023 In Marathi | नारी शक्ति वंदन अधिनियम महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे :
- महिला आरक्षणाचा कोटा कोठे लागू होणार नाही ?
A. लोकसभा
B. राज्यसभा
C. विधानपरिषद
D. विधानसभा
उत्तर: राज्यसभा आणि विधानपरिषद
2. कोणत्या साली प्रथमच महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले ?
A. 1993
B. 1996
C. 2014
D. 2023
उत्तर: 1996
3. महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या आरक्षणाचा प्रभाव किती वर्ष राहणार आहे ?
A. 5 वर्षे
B. 6 वर्षे
C. 10 वर्षे
D. 15 वर्षे
उत्तर: 15 वर्षे
4. महिला आरक्षण विधेयकाला कोणत्या नावाने संबोधले जाते ?
A. नारी सुरक्षा विधेयक
B. नारी शक्ती वंदन विधेयक
C. नारी भक्ति वंदन विधेयक
D. नारी सुविधा विधेयक
उत्तर: नारी शक्ती वंदन विधेयक
5. महिला आरक्षण विधेयक गेल्या किती वर्षांपासून संसदेत प्रलंबित होते ?
A. 27
B. 25
C. 20
D. 10
उत्तर: 27
6. महिला आरक्षण विधेयकानुसार महिलांसाठी लोकसभेत आणि राजयविधिमंडळात किती जागा राखीव असतील ?
A. 50 %
B. 25 %
C. ३३ %
D. 66 %
उत्तर: ३३ %
7. महिला आरक्षण विधेयक कितव्या घटनादुरुस्ती विधेयकाअंतर्गत मांडण्यात आले आहे ?
A. 102
B. 108
C. 120
D. 128
उत्तर: 128
8. महिला आरक्षण विधेयक अमलात आणण्यापूर्वी कोणती गोष्ट आवश्यक आहे ?
A. लोकसभा निवडणूक
B. विधानसभा निवडणूक
C. Delimitation Exercise (परिसीमन)
D. राज्यसभा निवडणूक
उत्तर: Delimitation Exercise (परिसीमन)
9. Delimitation Exercise (परिसीमन) म्हणजे काय ?
A. जातिनिहाय जनगणना करणे.
B. धर्माच्या आधारे जनगणना करणे.
C. जनगणनेच्या आधारे विविध विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांच्या सीमारेषा पुन्हा रेखाटणे.
D. मतदार नावनोंदणी करणे.
उत्तर: जनगणनेच्या आधारे विविध विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांच्या सीमारेषा पुन्हा रेखाटणे.
9. Delimitation Exercise (परिसीमन) करण्यासाठी कोणता आयोग काम करतो ?
A. नीती आयोग
B. जनगणना आयोग
C. लोकसेवा आयोग
D. भारताचे परिसीमन आयोग
उत्तर: भारताचे परिसीमन आयोग (Delimitation Commission of India)
10. भारताच्या सीमांकन (परिसीमन) आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?
A. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
B. उपराष्ट्रपती
C. मुख्य निवडणूक आयुक्त
D. लोकसभा अध्यक्ष
उत्तर: सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
11. 1973 साली परिसीमन आयोग कोणत्या परिसीमन कायद्यानुसार स्थापन करण्यात आला ?
A. Delimitation Commission Act 1972
B. Delimitation Commission Act 1973
C. Delimitation Commission Act 1952
D. Delimitation Commission Act 1962
उत्तर: Delimitation Commission Act 1972
12. भारतात परिसीमन आयोग किती वेळा स्थापन करण्यात आले आहेत ?
A. 2
B. 3
C. 4
D. 5
उत्तर: 4 वेळा
13. परिसीमन आयोगाला (Delimitation Commission) कोणत्या नावानेही संबोधले जाते ?
A. Public Service Commission
B. Boundary Commission
C. Competition Commission
D. Law Commission
उत्तर: Boundary Commission
14. पहिला परिसीमन कायदा (Delimitation Act) कधी लागू करण्यात आला ?
A. 1947
B. 1950
C. 1952
D. 1962
उत्तर: 1952
15. खालीलपैकी कोणत्या साली परिसीमन आयोग स्थापन करण्यात आला नव्हता ?
A. 1952
B. 1963
C. 1973
D. 1982
उत्तर: 1982