Current Affairs In Marathi 9 January 2024 मध्ये ॲपल ऑन व्हील्स, Avtar Group’s Top Cities for Women in India, पृथ्वीचा परिभ्रमण दिवस, आफ्रिकन नॅशनल काँग्रेस, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट – 2024, गोल्डन ग्लोब 2024 खरेदी पोर्टल अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.
Table of Contents
MPSC Current Affairs In Marathi 9 January 2024
सर्व स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती, तलाठी भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व पदांसाठी दररोजच्या चालू घडामोडीवर आधारित उपयुक्त प्रश्न राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अर्थशास्त्र, पुरस्कार, नियुक्त्या, क्रिडा, मनोरंजन आणि दिनविशेष खाली सविस्तर पणे दिले आहेत.
Monthly Current Affairs
Current Affairs in Marathi 9 January 2024 – Headlines
9 January 2024 Current Affairs in Marathi
National
- आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट – 2024 या अपंग व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन गोवा शहरात करण्यात आले आहे.
- पश्चिम बंगाल राज्यातील मौबन मध, Prince of Rice (तांदूळ), टांगेल, गोरोड आणि कडियाल (साडी) वस्तूंना GI टॅग प्राप्त झाले आहेत.
- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची पाचव्या टर्मसाठी पुन्हा निवड झाली आहे.
- बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी राजकीय पक्षाने बहिष्कार घातला होता.
- ONGC ने बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यातील आपल्या प्रमुख खोल पाण्याच्या प्रकल्पातून तेल उत्पादन सुरू केले आहे.
- किर्गिस्तानने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे.
Economics
- टाटा पॉवरने अलीकडेच तामिळनाडू राज्यात ₹70,000 कोटी गुंतवणुकीची घोषणा केली.
- दिल्लीचे दरडोई उत्पन्न 14% पेक्षा जास्त वाढले, चालू आर्थिक वर्षात 4,44,768 रुपयांवर पोहोचले
Technology
- व्हिएतनामने भारताच्या तामिळनाडू राज्यात इलेक्ट्रिक वाहन सुविधेत $2 अब्जची गुंतवणूक केली आहे.
Sports
- भारतीय नेमबाजांनी जकार्ता, इंडोनेशिया येथे आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्यांच्या मोहिमेची आशादायक सुरुवात केली.
Awards
- महाराष्ट्र राज्यातील डॉ. अमोल कोल्हे आणि डॉ. श्रीकांत शिंदे या खासदारांना यावर्षीचा संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झाला आहे.
- अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे सीईओ म्हणून अश्वनी गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Other
- ओपेनहाइमर’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांना गोल्डन ग्लोब 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-मोशन पिक्चर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- गोल्डन ग्लोबची 81 वी आवृत्ती कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथे आयोजित करण्यात आली होती.
- मोशन पिक्चर, ड्रामा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘सिलियन मर्फी’ला देण्यात आला.
- आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (ANC), 8 जानेवारी रोजी आपला स्थापना दिवस साजरा करते.
- दरवर्षी, 8 जानेवारी रोजी पृथ्वीचा परिभ्रमण दिवस साजरा केला जातो.
चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न – 9 January 2024
खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. Current Affairs In Marathi 9 January 2024
Current Affairs Quiz In Marathi 9 January 2024
Q1. “फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी: अॅन ऑटोबायोग्राफी” हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे?
(A) मनमोहन सिंह
(B) एस सोमनाथ
(C) मनोज नरवणे
(D) शशी थरूर
Ans: मनोज नरवणे
Q2. गोल्डन ग्लोब 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-मोशन पिक्चरचा पुरस्कार कोणाला मिळाला?
(A) सिलियन मर्फी
(B) ख्रिस्तोफर नोलन
(C) मॅथ्यू मॅकफॅडियन
(D) लुडविग गोरानसन
Ans: ख्रिस्तोफर नोलन
Q3. आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत कोणत्या संघाने सुवर्णपदक जिंकले?
(A) जपान
(B) भारत
(C) चीन
(D) ऑस्ट्रेलिया
Ans: भारत
Q4. बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यातील खोल समुद्र प्रकल्प कोणाकडून चालवला जात आहे?
(A) इंडियन ऑइल
(B) भारतीय पेट्रोलियम
(C) रिलायन्स रिफायनरी
(D) ONGC
Ans: ONGC
Q5. टाटा पॉवरने अलीकडेच कोणत्या राज्यात ₹70,000 कोटी गुंतवणुकीची घोषणा केली?
(A) तामिळनाडू
(B) मध्य प्रदेश
(C) उत्तर प्रदेश
(D) बिहार
Ans: तामिळनाडू
Q6. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदारांना यावर्षीचा संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) डॉ. अमोल कोल्हे
(B) सुप्रिया सुळे
(C) श्रीकांत शिंदे
(D) धनंजय महाडीक
Ans: डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे
Q7. भारतात कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) लखनऊ
(B) उज्जैन
(C) जयपुर
(D) अहमदाबाद
Ans: अहमदाबाद
Q8. बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने बहिष्कार घातला होता ?
(A) बांग्लादेश जनता दल
(B) मुस्लिम लीग
(C) बांग्लादेश मुक्ती मोर्चा
(D) बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी
Ans: बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी
Q9. कोणत्या राज्यात सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे?
(A) तामिळनाडू
(B) मध्य प्रदेश
(C) उत्तर प्रदेश
(D) हिमाचल प्रदेश
Ans: हिमाचल प्रदेश
Q10. पश्चिम बंगाल राज्यातील कोणत्या वस्तूंना GI टॅग प्राप्त झाले आहेत ?
(A) मौबन मध
(B) Prince of Rice (तांदूळ)
(C) टांगेल, गोरोड आणि कडियाल (साडी)
(D) वरील सर्व
Ans: वरील सर्व
Q11. व्हिएतनामने भारताच्या कोणत्या राज्यात इलेक्ट्रिक वाहन सुविधेत $2 अब्जची गुंतवणूक केली आहे?
(A) तामिळनाडू
(B) उत्तराखंड
(C) हिमाचल प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans: तामिळनाडू
Q12. आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (ANC) कोणत्या दिवशी रोजी आपला स्थापना दिवस साजरा करते?
(A) 8 डिसेंबर
(B) 8 फेब्रुवरी
(C) 8 जानेवारी
(D) 8 मार्च
Ans: 8 जानेवारी
Q13. पृथ्वीचा परिभ्रमण दिवस कधी साजरा केला जातो?
(A) 10 जानेवारी
(B) 9 जानेवारी
(C) 8 जानेवारी
(D) 7 जानेवारी
Ans: 8 जानेवारी
Q14. अवतार ग्रुपच्या अहवालानुसार भारतीय महिलांसाठी सर्वसमावेशकता आणि कामकाजी महिलांसाठी अनुकूलतेच्या बाबतीत सर्वोत्तम शहर कोणते ठरले आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) बेंगळुरू
(D) पुणे
Ans: चेन्नई
Q15. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट – 2024 या अपंग व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?
(A) पुणे
(B) गांधीनगर
(C) गोवा
(D) हैदराबाद
Ans: गोवा