Current Affairs in Marathi 9 December 2023 मध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर मेणाचा पुतळा, Best Personality- Empowerment Of Differently-Abled, सूर्य नूतन, ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.
Table of Contents
Monthly Current Affairs
Current Affairs in Marathi 9 December 2023 – Headlines
9 December 2023 Current Affairs in Marathi
National
- डॉ. बी.आर. आंबेडकरांच्या मेणाच्या पुतळ्याचे जयपूर वॅक्स म्युझियम, नाहरगड किल्ला येथे अनावरण करण्यात आले आहे.
- पुतळ्याचे उंची 5 फूट 11 इंच आणि वजन अंदाजे 38 किलो आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर 2023 रोजी नियोजित असलेल्या इन्फिनिटी फोरमच्या दुसर्या आवृत्तीला संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) आणि GIFT सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘Best Personality- Empowerment Of Differently-Abled’ साठी राष्ट्रीय पुरस्कार प्रशांत अग्रवाल यांना देण्यात आला आहे.
- उसापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलवर भारत सरकारने बंदी घातली आहे.
- तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ रेवंथ रेड्डी यांनी घेतली आहे.
Economics
- महाराष्ट्र सरकारने कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंग वर 28% GST आकारण्याचे विधेयक विधानसभेत मांडले आहे.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे असलेल्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा (UCB) परवाना रद्द केला आहे.
Technology
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (इंडियन ऑइल) आणि ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस यांनी “सूर्य नूतन” या इंडियन ऑइलने विकसित केलेल्या इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारी केली आहे.
- अलीकडेच COP-28 मध्ये प्रतिष्ठित ‘ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड’ IIT Mandi विद्यापीठाने जिंकला आहे.
Sports
- श्रद्धा चोपडे हिने अंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे.
- अलीकडेच सुरेश रैनाची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Awards
- व्हाईस एडमिरल दिनेश त्रिपाठी 4 जानेवारी रोजी नौदल उपप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
- मॅक्स लाइफ इन्शुरन्सने राजीव आनंद यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
- आनंद कृपालू यांनी स्विगीचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
Other
- नागा हेरिटेज व्हिलेज, किसामा येथे 5 वा नागालँड मधमाशी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
- दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या (SAARC) इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून दरवर्षी ८ डिसेंबर रोजी सार्क चार्टर डे पाळला जातो.