Current Affairs in Marathi 3 December 2023 मध्ये जल इतिहास उत्सव, बीएसएफ 59 वा स्थापना दिवस, जागतिक एड्स दिन, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, UN हवामान बैठक अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.
Table of Contents
Monthly Current Affairs
Current Affairs in Marathi 3 December 2023 – Headlines
3 December 2023 Current Affairs in Marathi
National
- UAE ने COP28 मध्ये ग्लोबल क्लायमेट सोल्युशन्ससाठी $30 बिलियन फंड देण्याचे जाहीर केले.
- जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागांतर्गत राष्ट्रीय जल अभियानाने दिल्लीतील मेहरौली येथील जहाज महल येथील शम्सी तालाब येथे ‘जल इतिहास उत्सव’ आयोजित केला होता.
- केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील तरुणांचे कौशल्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) प्लस ची पायाभरणी भुवनेश्वर शहरात केली आहे.
- 25 लाख शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी बिहार सरकारने ‘मिशन दक्ष’ सुरू केले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2028 वर्षी UN हवामान बैठक (COP33) भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Economics
- भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या अहवालानुसार, 24 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात $2.5 अब्जची लक्षणीय वाढ झाली आहे.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या चलनविषयक धोरणात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे त्यांनी ₹2,000 च्या 97.26 टक्के नोटा 19 मे 2023 पर्यंत चलनातून यशस्वीपणे काढून घेतल्या आहेत.
- UPI ने October महिन्यात 17.40 लाख कोटी रुपयांचे ११.२४ अब्ज व्यवहार नोंदवले आहेत.
Technology
- दुबई येथे होणाऱ्या COP28 या हवामान बदल परिषदेच्या 28 व्या आवृत्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी LeadIT 2.0 चे अनावरण केले.
- सर्वसमावेशक आणि न्याय्य उद्योग संक्रमणावर प्राथमिक लक्ष केंद्रित करून या उपक्रमाचा उद्देश उभरत्या अर्थव्यवस्थांना आर्थिक सहाय्य प्रदान करताना कमी-कार्बन तंत्रज्ञानाचा सह-विकास आणि हस्तांतरण सुलभ करणे हा आहे.
Sports
- रुतुराज गायकवाड पुरुषांच्या T20 मध्ये सर्वात जलद 4,000 धावा करणारा भारतीय ठरला आहे.
Awards
- अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) शास्त्रज्ञ व्ही.आर.ललितांबिका यांना फ्रान्स देशाचा सर्वोच्च सन्मान ‘लिजन ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले आहे.
Other
- सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) 1 डिसेंबर रोजी आपला 59 वा स्थापना दिवस साजरा केला.
- गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.