Current Affairs Quiz | प्रश्न उत्तरे | 19 December 2023

Current Affairs Quiz In Marathi 19 December 2023 मध्ये स्वरवेद महामंदिर, सुरत डायमंड एक्सचेंज, काशी तमिळ संगमम, JN1 विषाणू , Surface to Air Missile for Assured Retaliation, लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs Quiz In Marathi 19 December 2023

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs Quiz In Marathi 19 December 2023

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 19 डिसेंबर 2023

Q1. जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे ?

(A) उज्जैन
(B) उमराहा, वाराणसी
(C) अयोध्या
(D) इंदौर

Ans: उमराहा, वाराणसी


Q2. वाराणसी येथे उद्घाटन झालेले जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्राचे नाव काय आहे ?

(A) आर्ट ऑफ लिविंग मंदीर
(B) कृष्ण महामंदिर
(C) नारायण मंदिर
(D) स्वरवेद महामंदिर

Ans: स्वरवेद महामंदिर


Q3. जगातील सर्वात मोठी ऑफिस कॉम्प्लेक्सची इमारत म्हणून कोणत्या वास्तुला मान मिळाला आहे?

(A) सुरत डायमंड एक्सचेंज
(B) मुंबई डायमंड एक्सचेंज
(C) नोयडा आयटी हब
(D) बेंगळुरू आयटी सिटि

Ans: सुरत डायमंड एक्सचेंज


Q4. जगातील सर्वात मोठी ऑफिस कॉम्प्लेक्सची इमारत सुरत डायमंड एक्सचेंज चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अमित शाह
(B) नरेंद्र मोदी
(C) भूपेंद्रभाई पटेल
(D) विजय रुपाणी

Ans: नरेंद्र मोदी


Q5. सुरत डायमंड एक्सचेंज नी कोणत्या जागतिक वास्तुला मागे टाकत जगातील सर्वात मोठी ऑफिस कॉम्प्लेक्सचा मान मिळवला आहे?

(A) पेंटागॉन
(B) व्हाइट हाऊस
(C) वर्ल्ड ट्रेड सेंटर
(D) न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज

Ans: पेंटागॉन


Q6. वाराणसी आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने कोणता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले आहे?

(A) मेरी भारत महान
(B) उत्तर प्रदेश तामिळनाडू परिषद
(C) काशी तमिळ संगमम
(D) वंदे काशी-तमिळ महोत्सव

Ans: काशी तमिळ संगमम


Q7. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (GPAI) समिट 2023 मध्ये भारतातील पहिल्या तीन AI स्टार्टअप्समध्ये कोणत्या स्टार्टउप कंपनीने स्थान मिळवले आहे?

(A) Ind Robotics
(B) Genrobotics
(C) Bharat AI
(D) Bharat AI Tech

Ans: Genrobotics


Q8. भारताच्या कोणत्या क्षेपणास्त्राने जागतिक स्तरावर 25 किमी अंतरावर एकाच वेळी चार लक्ष्ये भेदून विक्रम नोंदवला आहे?

(A) कलाम
(B) पृथ्वी
(C) विजय
(D) आकाश

Ans: आकाश


Q9. भारतीय वायुसेनेने नुकतेच आंध्र प्रदेशात कोणत्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) आकाश
(B) पृथ्वी
(C) गरुड
(D) समर

Ans: समर (SAMAR-Surface to Air Missile for Assured Retaliation)


Q10. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारत कोणत्या स्थानी पोहचला आहे?

(A) 30
(B) 35
(C) 38
(D) 40

Ans: 38


Q11.राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB-National Crime Records Bureau) च्या अहवालानुसार कोणते शहर 2022 मध्ये अन्न भेसळ प्रकरणात अव्वल स्थानी आहे?

(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) चेन्नई
(D) कोलकाता

Ans: हैदराबाद


Q12. शाश्वत विकासासाठी नेतृत्व प्रदान करणे आणि भविष्यातील पिढ्यांना शाश्वत विकासासाठी तयार करण्यासाठी कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी ची स्थापना करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेने कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली आहे?

(A) IIT चेन्नई
(B) IIT कानपूर
(C) IIT बॉम्बे
(D) IIT खरगपुर

Ans: IIT कानपूर


Q13. कोणत्या देशाने रेउवेन अझर यांची भारतातील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे?

(A) रशिया
(B) इस्राइल
(C) पॅलेस्टाईन
(D) इराण

Ans: इस्राइल


Q14. 2023 वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे?

(A) नोव्हाक जोकोविच
(B) राफेल नदाल
(C) डॅनियल मेदवेदेव
(D) रॉजर फेडरर

Ans: नोव्हाक जोकोविच


Q15. भारतात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या JN.1 विषाणूचे रुग्ण आढळले आहेत?

(A) महाराष्ट्र
(B) तामिळनाडू
(C) तेलंगणा
(D) केरळ

Ans: केरळ