Current Affairs in Marathi 6 November 2023 : ऑस्ट्रेलिया इंडिया एज्युकेशन अँड स्किल कौन्सिल, राज्यस्तरीय इनोव्हेशन कार्यशाळे, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2022-2023, आशियाई तिरंदाजी स्पर्धे, जल दिवाळी – पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.
Table of Contents
Monthly Current Affairs
Current Affairs in Marathi 6 November 2023 – Headlines
Headlines
National
- गुजरातमधील IIT गांधीनगर येथे पहिली ऑस्ट्रेलिया इंडिया एज्युकेशन अँड स्किल कौन्सिलची बैठक होणार आहे.
- कलर्स या मनोरंजन चॅनेलने सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयासोबत सहकार्य केले आहे.
- फिलीपिन्सने चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
- राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2022-2023 नुसार, तामिळनाडू राज्य ग्राहक सशक्तीकरण उपक्रमांमध्ये अग्रगण्य राज्य म्हणून उदयास आले.
- NITI आयोग आयआयएम बंगळुरूमध्ये राज्यस्तरीय इनोव्हेशन कार्यशाळेचे आयोजन करणार आहे.
- 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत ही कार्यशाळा पार पडणार आहे.
Economics
- Solvent Extractor’s Association of India (SEA) आणि Brazilian Association of Vegetable Oil Industries (ABIOVE) यांनी सोयाबीन तेलाच्या आयातीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
- एअरबस कंपनीने महिंद्रा एरोस्पेस सोबत विमानाच्या पार्ट आणि घटकांच्या निर्मितीसाठी करार केला आहे.
Technology
- NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचा पहिला 50 मेगावॅटचा पवन प्रकल्प दयापार, कच्छ, गुजरातमध्ये सुरू करण्यात आला आहे.
- कॉलिन्स डिक्शनरीने 2023 साठी “AI” या शब्दाला वर्ड ऑफ द इयर Word of the year म्हणून घोषित केले आहे.
Sports
- बांगलादेश 24 व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन करणार आहे.
- Bhaane या कपड्यांच्या ब्रँडने राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनशी भागीदारी करत भारतात NBAstore.in हे ऑनलाइन स्टोअर लॉंच केले आहे.
Awards
- वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी, सुरेंद्र अधना यांची 2024-26 या कालावधीसाठी युनायटेड नेशन्सच्या प्रशासकीय आणि अर्थसंकल्पीय प्रश्नांवरील सल्लागार समितीवर (ACABQ) सेवा देण्यासाठी पुन्हा निवड झाली आहे.
- दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन यांची सशस्त्र सेना न्यायाधिकरण (एएफटी) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
- रोहित ऋषी यांची बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती
Other
- गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) “जल दिवाळी – पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान” नावाचा एक महत्त्वाचा उपक्रम सादर केला आहे.
- मोहिमेत सहभागी होणाऱ्या महिलांना त्यांच्या संबंधित शहरांमध्ये असलेल्या जल प्रक्रिया केंद्रांना (WTPs) भेटी देऊन जलशुद्धीकरण प्रक्रियेविषयी प्रत्यक्ष ज्ञान घेता येणार आहे.
- इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्र ‘निलावू कुडीचा सिंहंगल’ चे प्रकाशन मागे घेतले आहे.
- International Day for Preventing the Exploitation of the Environment in War and Armed Conflict युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 6 नोव्हेंबर ला साजरा केला जातो.