National | राष्ट्रीय
- भारत आणि एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) च्या भागीदारीत नवी दिल्ली येथे हवामान बदल आणि आरोग्य केंद्र उघडणार आहे.
- आसाम सरकारने, आसामच्या सर्वात स्वछ जिल्ह्याचा गौरव करण्यासाठी ‘MODI’ योजनेचे अनावरण केले आहे.
- MODI : Most Outstanding District Initiative .
- विजेत्या जिल्ह्याला बक्षीस म्हणून 100 करोंड रुपयांचा निधी दिला जाणर आहे.
- राजस्थान सरकारने राजस्थानमधील सर्व महिलांसाठी नुकतीच एक योजना जारी केली आहे. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना असे या योजनेचे नाव आहे.
- या योजनेअंतर्गत, सरकार पहिल्या फेरीत राजस्थानमधील महिलांना 40 लाखांहून अधिक स्मार्टफोन उपलब्ध करून देणार आहे.
- आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पहिली महिला क्षेत्र संचालक मिळणार आहे.
Appointments | नियुक्त्या
- झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन मनंगाग्वा (Emmerson Mnangagwa) दुसऱ्या आणि अंतिम टर्मसाठी पुन्हा निवडून आले.
Summits & Conferences | परिषदा
- भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील तिसरा उच्चस्तरीय संवाद (HLD) नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
- बैठकीदरम्यान, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि युरोपियन कमिशनचे कार्यकारी उपाध्यक्ष वाल्डिस डोम्ब्रोव्स्किस यांनी भारत आणि EU दरम्यान सुरू असलेल्या तीन वाटाघाटींचा आढावा घेतला.
- या वाटाघाटींमध्ये खालील करारांचा समावेश आहे:
- एक स्वतंत्र गुंतवणूक संरक्षण करार. (A Standalone Investment Protection Agreement)
- भौगोलिक संकेत करार. (Geographical Indications Agreement)
- भारत-EU मुक्त व्यापार (India-EU Free Trade Agreement)
Economics Banking | अर्थव्यवस्था
- L&T, IOCL आणि Renew यांनी ग्रीन हायड्रोजनसाठी संयुक्त उपक्रम तयार केला आहे.
- संयुक्त उपक्रम कंपनीचे नाव GH4India प्रायव्हेट लिमिटेड आहे जेथे कंपन्यांचा प्रत्येकी 33.33% हिस्सा असेल, असे L&T ने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
- अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरणाला आरबीआयची मान्यता दिली आहे.
Sports | क्रीडा
- नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.
- पारुल चौधरीने महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत राष्ट्रीय विक्रम मोडला आहे.
- पुरुषांच्या 4×400 मीटर रिले अंतिम फेरीत भारत पाचव्या स्थानावर राहिला आहे
Technology | तंत्रज्ञान
- NASA, SpaceX यांनी मिळून चार देशांतील चार अंतराळवीरांना ISS वर पाठवले आसून या मोहिमेचे नाव क्रू-7 आहे.
- NASA- ही अमेरिकन अंतराळ संस्था आहे.
- SpaceX- ही Elon Musk यांची रॉकेट कंपनी आहे.
- ISS – International Space Station ही अवकाशात तरंगणारी एक प्रयोगशाळा आहे.
- केंद्रीय मंत्री देवुसिंह चौहान यांनी C-DOT नी तयार केलेली Cyber threat detection, resolution system Trinetra (त्रीनेत्र) लॉंच केली आहे.
- C-Dot – Centre for Development of Telematics ही भारत सरकारच्या मालकीचे दूरसंचार तंत्रज्ञान विकास केंद्र आहे.
Important Questions | महत्वाचे प्रश्न
- 27 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2023 या कालावधीत ब्राइट स्टार-23 या बहुपक्षीय सरावाचे यजमान कोणते राष्ट्र आहे?
- अलीकडेच जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पहिला सुवर्णपदक विजेता कोण बनला?
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने राज्याच्या विभागांमध्ये किती ‘अटल निवासी शाळा’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे?
- Viacom18 च्या डिजिटल व्यवसाय विभागाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- कोणत्या स्पेस एजन्सीने अलीकडेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर क्रू-7 मोहीम सुरू केली आहे (ISS)?
- G20 कल्चर वर्किंग ग्रुपची बैठक कोठे झाली?
- 2023 BWF (बॅडमिंटन) वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडू HS Prannoy ने कोणत्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट “अमृत भारत स्टेशन योजने” अंतर्गत किती कोटी रुपये खर्चून नवीन फरक्का जंक्शनचा पुनर्विकास केला जाणार आहे?
- C-Dot या भारत सरकारच्या दूरसंचार तंत्रज्ञान विकास केंद्राने बनवलेल्या सायबर सुरक्षा शोध प्रणालीचे नाव काय आहे ?
- झिम्बाब्वेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यांचे नाव काय आहे ?
उत्तरे:
प्रश्न क्र. | उत्तरे |
---|---|
1 | Egypt |
2 | नीरज चोप्रा |
3 | 18 |
4 | किरण मणी |
5 | NASA |
6 | वाराणसी |
7 | पुरुष एकेरी शटलर |
8 | 31 करोड़ रुपये |
9 | Trinetra (त्रीनेत्र) |
10 | इमर्सन मनंगाग्वा |